पोक्सो म्हणजे #द_प्रोटेक्शन_ऑफ_चिल्ड्रन_फ्रॉम_सॅक्शुअल_ऑफेंसेस अॅक्ट अगदी सोप्या मराठीत सांगायचं झालं तर, #लैंगिक_अत्याचारांपासून_बालकांचे_संरक्षण करणे बाबतचा कायदा असा होतो.

बाल लैंगिक अत्याचारांसंदर्भात कायद्याच्या माध्यमातून संरक्षण कसे मिळते? कायद्यामध्ये कोण कोणत्या तरतुदी आहेत? आणि बाल लैंगिक शिक्षण ही आज काळाची गरज बनली आहे आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या लैंगिक समस्या, अडचणींबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी. #प्रिसिजन_फाउंडेशन आणि #फॅमिली_प्लॅनिंग_असोसिएशन शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने #सर्वंकष_लैंगिक_शिक्षण या विषयावर जवळपास 21 शाळांमधील जवळपास 5000 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आल्या. त्याचाच पुढचा भाग म्हणून या शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांसाठी देखील फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन च्या सोलापूर शाखेच्या कार्यालयांमध्ये मार्गदर्शन ठेवण्यात आला या प्रसंगी बाल लैंगिक शोषण, बाल लैंगिक शिक्षण या संदर्भात कायद्याचं पाठबळ कसं आहे? कायद्याची बाजू कोणती? कोणते कायदे आहेत? या सगळ्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध विधिज्ञ #सरोजिनी_तमशेट्टीयांनी पोक्सो कायद्यासंदर्भात मार्गदर्शन केले. काय आहे हा पोक्सो कायदा? तो लैंगिक अत्याचाराच्या विरोधात कशा पद्धतीने सक्षम काम करतोय? आणि एक शिक्षक म्हणून आपण कोणत्या गोष्टी, कोणत्या बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे? यासाठी मास्टर ट्रेनर, रिसोर्स पर्सन आणि शिक्षक यांच्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. हा कायदा एक पालक म्हणून, एक शिक्षक म्हणून आपण कसा समजून घेतला पाहिजे यासाठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती आणि हे मार्गदर्शन आपल्या सगळ्यांसाठी उपयुक्त ठरेल, त्याचबरोबर आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांनादेखील या पोक्सो कायद्याच्या संदर्भात माहिती समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.
धन्यवाद!
आपला स्नेहांकित,
srujanshilshikshak.blogspot.in

Meet me on
 Instagram     facebook     Twitter    WhatsApp     YouTube

Post a Comment

Previous Post Next Post