"विद्यार्थ्यांमध्ये रुजविली वैज्ञानिक जिज्ञासा"
"मारुती शहाणे व दिपाली शहाणे यांचे विद्यार्थी चमकले राज्यस्तरावर"
हरिभाई देवकरण प्रशाला मध्ये कार्यरत असलेले मारुती शहाणे व श्री समर्थ विद्यामंदिर येथे कार्यरत असलेल्या दिपाली शहाणे या शहाणे दांपत्याने कठोर परिश्रम केले. त्याचे फळही त्यांना लवकरच मिळाले. त्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा वाढवण्यासाठी प्रयत्न केला. त्यांच्या या चिकाटीमुळे त्यांच्या विद्यार्थ्यांनी शहर जिल्हा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये यश मिळवले. -राजकिरण चव्हाण. जिल्हा समन्वयक, सर फाऊंडेशन, सोलापूर.