दैनिक सकाळ. दि. ११.०८.२०१९


▪️ समस्या मुलांच्या 'स्क्रीन टाईम'ची▪️
शिक्षणातील तंत्रज्ञान
प्रत्येक मुलांना स्क्रीनचं खूप आकर्षण असतेच. मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर यापैकी कोणत्याही गोष्टी वाईट नाहीत. पण, त्यांचा अतिरेक मात्र दुष्परिणाम करणारा आहे.
#राजकिरण_चव्हाण, सोलापूर.
आज अनेक पालकांची आपल्या मुलांबाबत एक तक्रार ऐकण्यास मिळतेच ती म्हणजे, आमची मुले सतत टीव्ही मोबाईल समोर बसलेली असतात. अशावेळी त्यांचं कोणत्याही गोष्टीकडे लक्ष लक्षच नसते. सतत ती मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर यापैकी कोणत्या ना कोणत्या स्क्रीनसमोर बसलेली असतात. काय करावे म्हणजे हा स्क्रीन समोरील वेळ कमी होईल?
तसं पाहिलं तर प्रत्येक मुलांना स्क्रीनचं खूप आकर्षण असतेच. मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर यापैकी कोणत्याही गोष्टी वाईट नाहीत. पण, त्यांचा अतिरेक मात्र दुष्परिणाम करणारा आहे. यासाठी खाली दिलेल्या गोष्टी अवलंबल्या तर मुलांचा 'स्क्रीन टाईम' कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतील.
▪️जेवण करताना स्क्रीन टाईम नको.
▪️काहीतरी बघत जेवण करू देऊ नका. पाल्यांना कुटुंबीय/ मित्रपरिवार यांच्याशी गप्पा मारत जेवण्याची सवय लावा.
▪️दिवसभरात किती वेळ मुलांची मुलांनी स्क्रीन समोर घालवायचा ते ठरवा.
▪️आठवड्यातून एक दिवस' नो स्क्रीन डे' करा. त्या दिवशी घरात मोबाईल लॅपटॉप टीव्ही सगळे बंद असू द्या.
▪️इमर्जन्सी किंवा संपर्क राहावा यासाठी मोबाईल स्विच ऑफ करायचा नसला तरी डाटा बंद करून टाका.
मुले झोपताना मोबाईल किंवा टीव्हीसमोर काहीही बघू नका. मुले झोपताना शांत झोप कशी लागेल यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
▪️सोशल मिडिया साईट्सवर कितीवेळ जायचं याचा विचार करा. मुले अनुकरणप्रिय असतात त्यामुळे तिथे जाणारा वेळ कमी करा.
▪️स्क्रीन टाईम वर मर्यादा आणण्यासाठी सरळ टायमर लावा.
▪️मुलांना काहीतरी छंद जोपासण्यास, जे आवडतं ते करण्यास मुलांना प्रोत्साहित करा.
▪️सतत मोबाईलवर गेम खेळत बसण्याऐवजी मैदानावर प्रत्यक्षात खेळण्यास प्रोत्साहन द्या.
मुलांना आवडत असेल त्या प्रकारचा व्यायाम करायला सांगा. हे आभासी जग मुठीत सामावत असले तरी खरे खूप मोठे आहे याची जाणीव होण्यासाठी विविध ठिकाणी मुलांसोबत प्रवास करा. खऱ्या जगाच्या सौंदर्याचा मुलांना प्रत्यक्ष अनुभव घेऊ द्या.
#सौजन्य#दैनिक_सकाळ

Meet me on
 Instagram     facebook     Twitter    WhatsApp     YouTube

Post a Comment

Previous Post Next Post