ई-लायब्ररी म्हणजे नेमकं काय असू शकेल याचा आपण थोडक्यात विचार करुया. ई-लायब्ररी अर्थात इलेक्ट्रॉनिक लायब्ररी. या अगोदर आपण लायब्ररी हा शब्द ऐकला असेल, वाचला असेल किंवा आपण या लायब्ररीमध्ये गेलाही असाल. त्याला आपण ग्रंथालय म्हणतो. शाळेमध्ये ग्रंथालयात विद्यार्थ्यांना शिक्षकांना वाचण्यासाठी खूप सारी पुस्तक असतात दरवर्षी नवनवीन पुस्तके शाळेमध्ये उपलब्ध केली जातात परंतु जागेअभावी पुस्तकांची संख्या वाढवण्या मध्ये कधीकधी मर्यादा येऊ शकते त्याचबरोबर पुस्तक खराब होणे पुस्तक फाटणे पुस्तक चोरीला जाण्याच्या समस्याही शाळेमध्ये होत असतात या वेळेला एक छान स उत्तर ती म्हणजे ई-लायब्ररी आपण तीन पद्धतीने विचार करू शकतो किंवा तीन भागांमध्ये करता येऊ शकतो ऑडिओ बुक ऑनलाइन फेसबुक आणि ई-बुक या तीन पद्धतीने आपण आपल्या शाळेतील लायब्ररी ही ई-लायब्ररी मध्ये रूपांतरित करू शकतो. - राजकिरण चव्हाण