ई-कंटेंटमध्ये शिक्षकांची भूमिका, त्यांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. कारण शिक्षक हा शिक्षण प्रक्रियेतील विद्यार्थ्यांच्या या सर्वात जवळचा घटक आहे. विद्यार्थ्यांची गरज, आवश्यकता, समज लक्षात घेऊन तो कंटेंट कसा वापरावा? कंटेंटमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असावा? याचे सर्वात ज्ञान जर कोणाकडे असेल तर ते म्हणजे या शिक्षकांकडे. म्हणूनच शिक्षकांना केंद्रीभूत ठेवून, शिक्षकांचा पुढाकार घेऊन हा ई-कंटेंट विकसित करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतलेला आहे. ...त्याविषयी - राजकिरण चव्हाण